July 21, 2024
Home » मुंबईत होणार बॉम्ब ब्लास्ट : खोटी माहिती देणारा अटकेत

वाळूज : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खोटी माहिती देणार्याला मंगळवारी दि. ६ रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. घोडबंदर गुजरातमार्गे मुंबईतील सीएसटीसह कुर्ला, दादर येथे बाॅम्बलास्ट होणार असल्याची खोटी माहिती पंजाब शिवानंद थोरवे ( ३३, रा. ह.मु. दत्तनगर रोड, रांजणगाव शेणपूंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुंबईतील कुर्ला, सीएसटी, दादर येथे बाॅम्बलास्ट होणार आहे. ते बाॅम्बलास्ट घोडबंदर गुजरातमार्गे मुंबईत होणार, अशी माहिती पंजाब थोरवे याने ११२ वर काॅल करून मुंबई कंट्रोलरूमला दिली. खळबळ उडवून देणार्या या फोननंतर मुंबई कंट्रोलरूमने लोकेशन ट्रेस करून एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे डायल ११२ वरील कर्मचार्यांनी रांजणगाव शेणपूंजीतील दत्तनगर रोडवरील रऊफ चाचा बांगडीवाले यांच्या घरात किरायाने राहत असलेल्या डोळेपांघरा ता. लोणार जि. बुलढाणा येथील पंजाब शिवानंद थोरवे याची चौकशी केली. यावेळी पंजाब याने त्याच्या मोबाईलवरून इमर्जन्सीवर काॅल करून हिंदु – मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून मुंबईतील सीएसटीसह कुर्ला, दादर येथे बाॅम्बलास्ट होणार असल्याची खोटी माहिती दिल्याचे निष्पण झाले. याप्रकरणी पोलीस शिपाई युसुफ ईब्राहीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!