July 25, 2024
Home » लाच घेणारा पद विस्तार विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…


पैठण ( औरंगाबाद ) : आडुळ येथील शौचालयाचे बांधकाम बिलाचा चेक काढण्यासाठी लाच मागून स्वीकारलेल्या पद विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी लाच प्रतिबंधक औरंगाबाद विभागा जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई दि. ७ रोजी करण्यात आली आहे.


अशोक सूर्यभान घोडके वय 36 वर्ष , पद विस्तार अधिकारी पंचायत समिती पैठण तथा प्रशासक ग्रामपंचायत अडुळ तालुका पैठण वर्ग 3 जिल्हा औरंगाबाद, बळीराम दगडू कळंबकर वय 56 वर्ष पद ग्रामविकास अधिकारी ,ग्रामपंचायत अडुळ ,तालुका पैठण ,जिल्हा औरंगाबाद असे लाच स्वीकारलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांचे वहिनी ग्रामपंचायत आडुळ येथील सरपंच होत्या त्यावेळी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडुळ येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्याचे काम मिळाले होते, काम तक्रारदार यांनी करून घेतले सदर कामाचे 2,10,000 रुपयाचे मंजूर बिलाचे चेक काढण्यासाठी अशोक सूर्यभान घोडके , यांनी दहा हजार रुपयाची लाचमागणी करून तडजोडीअंती 5000 रुपये स्वीकारले तर बळीराम दगडू कळंबकर यांनी चाळीस हजार रुपयाची मागणी करून 40000 रुपये स्वीकारले. ही कारवाई मा. संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद, मा .श्री. गोरखनाथ गांगुर्डे पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी – पोलीस उप अधिक्षक दिलीप साबळे, सापळा पथक – पोलीस अंमलदार भीमराव जिवडे विलास चव्हाण, पोलीस नाईक दिगंबर पाठक चालक पोलीस अंमलदार बागुल ला.प्र.वि,औरंगाबाद यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!