July 19, 2024
Home » दगड डोक्यात मारून खून; वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील घटना…

वाळूज : अपहरण झालेल्या मुलाची आमच्या विरुद्ध खोटी तक्रार का दिली असे विचारले असता झालेल्या भांडणांत डोक्यात दगडाने मारून, जबरदस्तीने औषध पाजत खून झाल्याची घटना कोपरावर शिवराई वाळूज गाव येथे घडली आहे. हि घटना दि ५ रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. रमेश बबन काळे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी आरोपी रावसाहेब सिताराम काळे याची पत्नी सुनंदा रावसाहेब काळे हिने फिर्यादी पोपट नारायण पवार व त्याची पत्नी व मुलगा यांचे विरुद्ध मुलगा किडनॅप केल्याची केस केलेली आहे. दिनांक 05 रोजी सकाळी 10.00 वाजेच्या सुमारास आरोपी  रावसाहेब सिताराम काळे याचा किडन्याप झालेला मुलगा हा सईदा भाभीच्या मळ्यात आल्या बाबत माहिती मिळाल्याने तेथे पोपट पवार, त्याची पत्नी व मेव्हणा रमेश बबन काळे असे गेले असता तेथे  किडनॅप झालेला मुलगा तेजवील हा  असल्याने ‘मग खोटी केस का केली?’ असे विचारले असता त्यावेळेस तेजवील तेथून  पळून गेला व आरोपींनी मंडळी जमून  पोपट पवार, त्याची पत्नी व मेव्हणा रमेश काळे यांना खाली पाडून दगडाने लाथा बुक्क्याने मारहाण केली. व पोपट पवार यांच्या पत्नीस डोक्यास मार लागल्याने ती तेथून पळून गेली. आरोपींनी रमेश काळे यांना धरुन काहीतरी औषध पाजून तेथून पळून गेले. त्यानंतर तेथे फिर्यादीची पत्नी अश्विनी हिने रिक्षा आणून त्यामध्ये पोपट पवार व रमेश काळे यांना उपचार कामी घाटी दवाखाना येथे दाखल केले असता उपचार चालू असताना रमेश बबन काळे हा मरण पावला.  रावसाहेब सिताराम काळे, शिवा सिताराम काळे राजवील ऊर्फ बुटेल रावसाहेब काळे,सुनंदा रावसाहेब काळे, अनिल शैनाज पवार सर्व रा. वाळूज तालुका गंगापूर जि. औरंगाबाद यांच्या विरुद्ध वाळूज  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!