July 21, 2024
Home » भररस्त्यात पतीकडून डोक्यात फावडे घालत पत्नीची निर्घृण हत्या; पैठण येथील घटना 

 पैठण : औरंगाबादच्या पैठण शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. बायोकाच्या डोक्यात फावड्याने मारहाण करून पत्नीला जागीच संपवून पती फरार झाला आहे. आज सकाळी सात वाजता ही घटना समोर आली असून, घटनास्थळी पैठण पोलीस दाखल झाले आहेत. त्यामुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून, मंदा पुंडलिक पौळ असे मृत महिलेच नाव आहे. 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ हा वीट भट्टी कामगार होता. दरम्यान मंदा पौळ यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले होते. मात्र नेहमी दोघांमध्ये जमत नसल्याने तीन वर्षांपूर्वी ते विभक्त झाले होते. त्यामुळे मंदा या कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करायच्या. तर त्यांना तीन मुलं आहेत. पण विभक्त राहून देखील ज्ञानेश्वर हा मंदा यांच्यावर संशय घेऊन त्यांना सतत त्रास देत होता. एवढचं नाही तर अनेकदा वाद घालत होता.

आज मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वर हा पैठण शहरातील नेहुरू चौकाकडे येत होता. तर त्याचवेळी मंदा या देखील कामासाठी निघाल्या होत्या. यावेळी दोघेही समोर आल्याने ज्ञानेश्वरने पुन्हा वाद घालायला सुरवात केली. वाद एवढा वाढला की, बाजूला सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेला फावडा उचलून ज्ञानेश्वरने मंदा यांच्या डोक्यात घातला. ज्यात मंदा गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानेश्वर तेथून फरार झाला. 

घटनास्थळी पोलीस दाखल… 

पैठण शहरातील नेहुरू चौकात एका महिलेच्या डोक्यात फावडे टाकून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलेला पैठण येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. तर पोलिसांकडून आरोपी पतीचा शोध घेण्यात येत आहे.

न्यूज मराठवाडा व्हाट्सअप ग्रुपला सहभागी व्हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!