July 26, 2024
Home » पैठण पोलिसांच्या सतर्कतेमुळे लग्नाचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड….

पैठण – बनावट लग्न लावून फरार होणारी लुटेरी दुल्हन व त्याच्या टोळीला पैठण पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून टोळीतील तीन आरोपी पोलिसांनी गजाआड केले आहे या प्रकरणी रात्री उशिरा पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट टोळी दुसऱ्यांदा पैठण पोलिसांच्या हाती लागली यापूर्वी याच टोळीने पैठण,जालना तसेच विविध शहरात व राज्यात धुमाकूळ घातला असून यापूर्वी यातील बनावट लग्न लावणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तसेच आणखी एकाचे धागेदारे या प्रकरणीशी असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका गरीब कुटुंबाचे होणारी फसवणूक व दीड लाख रुपये वाचले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!