July 20, 2024
Home » संतापजनक! वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करून विडिओ केला, गंगापूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून आरोपींकडून हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुमच्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या वृद्ध महिलेला आपल्या सोबत गंगापूर फाट्यावरून, आरोपींनी आपल्या घरी नेले.

वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला नग्न करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही.

माझ्या मुलीला तुझ्या नातूने पळून नेलं म्हणून, वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्या महिलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओ ही केला. संतापजनक म्हणजे तयार केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा केला. त्यामुळे अखेर या सगळ्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!