July 19, 2024
Home » रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

प्रशासन नरमले अखेर मागण्या मान्य

पळशी (सिल्लोड ): गेवराई शेमी (ता.सिल्लोड ) ते के-हाळा रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी तथा ठेकेदार व इंजिनिअर यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी गांवकरी यांनी (ता.5) सोमवार रोजी जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केले होते,त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते सकाळी 11 वाजता प्रा राहुलकुमार ताठे यांच्या नेतृत्वात आंदोलनला सुरुवात झाली

यावेळी आंदोलकांनी एकुण पाच मागण्या ठेवल्या होत्या त्यात ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे,बांधकाम इंजिनिअर व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे,कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी,काम पुर्ववत करावे व कामाची अंदाजित रक्कम ठेकेदार व इंजिनिअर यांच्या कडुन वसुल करण्यात यावे.यापैकी काम 15 दिवसाच्या आत काम पुर्ववत करुन देण्याची मागणी मान्य करण्यात आली तसेच चार मागण्यांच्या संदर्भात 20 दिवसात चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याची लेखी पञ उपअभियंता जि प बांधकाम विभाग यांनी शेतकर्यांना दिले.या आंदोलनासाठी शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ घडमोडे,पंचायत समिती सदस्य
साहेबराव बांबर्डे,नारायण पाटील बडक,राधाकृष्ण काकडे,गजानन जैस्वाल हे प्रमुख उपस्थितीत होते तर प्रत्यक्ष आंदोलनात उपसरपंच मुरलीधर ताठे,सुधाकर ताठे,सीताराम ताठे,जगन्नाथ ताठे,रामभाऊ ताठे,उत्तम ताठे,कडुबा ताठे,रावसाहेब ताठे,संतोष ताठे,दत्तु ताठे,रेवनाथ ताठे,पुंडलिक ताठे सहभागी होते तर आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!