July 20, 2024
Home » प्रदीप दिलीप पिंपळे हा दो. वर्षासाठी तडीपार …

Waluj : वाळुज औद्योगिक वसाहतीसह औरंगाबाद शहर हद्दीमध्ये चोरी, घरफोडी, अवैद्य धंदे करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व शांतता भंग करणार्या २७ वर्षीय गुंड प्रवृत्तीच्या तरुणास दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले.

प्रदीप दिलीप पिंपळे, वय २७, रा. टोकी हा औरंगाबाद शहर व वाळूज औद्योगिक वसाहतीच्या हद्दीमध्ये घर फोडी, चोरी विविध गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करीत होता. त्यांने भविष्यात कोणत्याही प्रकारचे गुन्हा करु नये. म्हणून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, औरंगाबाद शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यामुळेप्रदीप पिंपळे यास दिनांक 2 शनिवार रोजी पासुन दोन वर्षाकरीता औरंगाबाद जिल्हा व औरंगाबाद शहरातुन तडीपार करण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप गुरमे तसेच पोउपनि. चेतन ओगले, पोना बाबासाहेब काकडे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!