July 19, 2024
Home » कंपनीतून लोखंडी बुश चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद…

वाळूज : वाळूज औधोगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील बेस्ट फिनिशर्स या कंपनीमध्ये लोखंडी बुश चोरी केले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे हि घटना दि 30 रोजी साडेचारच्या सुमारास घडली.

गजानन सिरसाट व गणेश पवार यांची वाळूज औधोगिक परिसरात रांजणगाव गट नंबर 34 मधील प्लॉट नंबर 27/1 मध्ये भागीदारीने बेस्ट फिनिशर्स नावाने कंपनी आहे, दिनांक 29 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंपनीचे शटर बंद करून घरी गेले, दिनांक 30 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गणेश पवार हे शटर उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर मधोमध वाकलेले दिसले,त्या नंतर त्यांनी व कामगार बाबूराव कडेकर, प्रमोद सुलताने यांनी शटर उघडून पाहिले असता,  युनिट मध्ये कोटींग साठी आलेला माल ४० हजाराचे ४०० किलो लोखंडी बुश चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्या नंतर त्यांनी मला फोन करून घटनेची माहिती सिरसाट यांना दिली. दरम्यान या घटनेचे परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे  कैद झाले असून यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे, याप्रकरणी गजानन सिरसाट यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोकॉ. बाबासाहेब काकडे हे करीत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!