July 21, 2024
Home » दहा दुचाकींसह तीन दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात; सिल्लोड शहर पोलिसांची कारवाई …

सिल्लोड : सिल्लोड परिसरातील  वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना सिल्लोड शहर पोलिसांनी दि ३० रोजी अटक करून त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त केल्या आहे. 

सिल्लोड शहर पोलीस हे  दुचाकी चोरीच्या गुन्हाचा तपास करत असतांना आरोपी अक्षय गंजीधर कळात्रे वय २२ वर्षे, रा. लिहाखेडी ता. सिल्लोड जि.औरंगाबाद ह.मु. वडगाव कोल्हाटी बजाजनगर, औरंगाबाद याने त्याच्या साथीदार भुषन तेजराव पालोद रा. चांदापुर ता. सिल्लोड, रवि दामु बोराडे रा. चिंचपुर या तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता  त्यांनी विविध ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुल दिल्याने त्याच्या ताब्यातुन वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. हि कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक मंदीराज, पोउपनि झिंजुर्डे, सुनिल तळेकर, रशिद शेख, दगडु तडवी, परमेश्वर शिंदे, सलीमपाशा मोमीन,सत्यवान जांभळे,रवि अंभोरे, ज्ञानेश्वर बनसोडे, पोलीस अंमलदार रामानंद बुधवंत, सागर गायकवाड, काजळे, गणेश जाधव, चालक अंमलदार वाकेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!