July 25, 2024
Home » अवैध गौणखनिज करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही
औरंगाबाद : जिल्ह्यात अवैध गौणखनिज रोखण्यासाठी जिल्हास्तरावर, उपविभाग आणि तालुकास्तरावर पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. या पथकामार्फत 1 नोव्हेंबर  ते 28 नोव्हेंबर 22 पर्यंत तालुकानिहाय दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये तालुकानिहाय औरंगाबाद शहरात एकूण 9 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 26.30 लक्ष, वसुल करण्यात आलेली रक्कम 11.89 लक्ष, औरंगाबाद ग्रामीण एकूण 2 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 5.77 लक्ष, वसुल करण्यात आलेली रक्कम 2.25 लक्ष, ता.वैजापूर एकूण 3 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 3.64 लक्ष, वसुल करण्यात आलेली रक्कम 1.32 लक्ष, ता.गंगापूर एकूण 28.90 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 3.63 लक्ष, वसुल करण्यात आलेली रक्कम 11.89 लक्ष, ता.पैठण एकूण 3 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 3.27 लक्ष, वसुल करण्यात आलेली रक्कम 1.15 लक्ष, ता.फुलंब्री एकूण 4 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 8.55 लक्ष, ता.कन्नड एकूण 2 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 2.65 लक्ष, ता. सिल्लोड एकूण 5 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 11.06 लक्ष, वसुल करण्यात आलेली रक्कम 9.75 लक्ष, ता.सोयगांव एकूण 5 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम 12.74 लक्ष जिल्ह्याच्या एकूण 45 प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्क्म 102.88 लक्ष व वसूल करण्यणत आलेल्या रक्कम 29.99 लक्ष.  जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत 04 हायवा व 1 पोकलेन जप्त करण्यात आले आहेत.
सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात एकूण 304 प्रकरणांत दंडात्मक कार्यवाही करुन रु.712.71 लक्ष एवढा दंड आकारण्यात आला असून रु.326.85 लक्ष इतकी रक्कम वसुल करण्यात आली. तसेच सन 2022-23 मध्ये माहे नोव्हेंबर 22 अखेर जिल्ह्यातील एकूण 134 प्रकरणात दंडात्मक कार्यवाही करुन रु.279.25 लक्ष दंड आकारण्यात आला असून रु.119.08 लक्ष इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यापुढे देखील अवैध गौणखनिज प्रकरणी पथकाचे धाडसत्र व तपासणी सुरु असून विना परवानगी सुरु असलेले गौणखनिज उत्खनन व वाहतुकी विरुद्ध प्रभावीपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे परवानगी व वाहतुक पास घेऊनच गौणखनिजाचे उत्खनन व वाहतुक करण्यात यावी. अन्यथा नियमाप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्ववरे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!