July 23, 2024
Home » गावठी कट्यासह जिवंत काडतूस, तलवार बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात …

गावठी कट्यासह तलवार बाळगणारा अटकेत
गंगापूर : पोलीस ठाणे गंगापूर हद्दीत दोन व्यक्ती एक गावठी पिस्टल व एक धारदार तलवार स्वतःकडे बाळगत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली, या माहितीनुसार पोलिसांनी छापा मारत दोंघांना सोमवारी दि. २८ सायंकाळी अटक केली.
जगदीश संजय खरातकर वय २२ वर्ष रा. तांदूळवाडी ता. गंगापुर जि. औरंगाबाद, कुणाल गणेश तांदळे वर्य २८ वर्षे रा. लासुरनाकी, जयसिंग नगर, गंगापुर ता. गंगापुर जि. औरंगाबाद असे दोन्ही आरोपीचे नाव असून जगदीश खरातकर याच्या कमरेला एक ३५,००० रुपये किंमतीचा गावठी कट्टा व ४,००० रुपये किंमतीचे चार जिवंत काडतूस मिळून आले व कुणाल तांदळे याचे पाठीवर शर्टाच्या आतमध्ये एक ३,००० रुपये किंमतीची धारदार तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक, मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोना वाल्मीक निकम, दिपक सुरोसे, उमेश बकले, विजय धुमाळ, पोकों रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!