July 22, 2024
Home » इसरवाडी फाटा अपघात फाटा बनला का?आज पुन्हा अपघात दोन ठार एक गंभीर…

वाळूज : औरंगाबाद – नगर महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून इसरवाडी फाटा येथे  दिवसाआड अपघात होत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या नाशिक – औरंगाबाद MH14BT2500 या बसने ऊसतोड कामगारांची लोखंडी बैलगाडीला जोरात धडक दिल्याने या अपघातात दोनजण ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी झाले आहे, तर एक बैल ठार व एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दिनांक 29 रोजी सकाळी 6:10 वाजेच्या सुमारास घडला आहे.

कलीयाबाई गोविंद गिरे, आर्जुन गोविंद गिरे, असे दोन्ही मयताचे नाव असून गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे सर्व रा.मानिकपुंद ता.नांदगाव जिल्हा नाशिक हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना दवाखान्यातdदाखल कारणात आले आहे. हा अपघात एवढा भयानक होता कि, लोखंडी बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. दोन दिवसापूर्वी ट्रॅक्टर -ट्रक अपघातात एक ठार एक गंभीर हा अपघात झाला होता आज पुन्हा घडलेल्या अपघातामुळे इसरवाडी फाटा हा अपघाताचा फाटा बनला का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!