July 25, 2024
Home » ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला केराची टोपली- महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित

वाळूज : राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत कृषी पंपाचे वीज बिल सक्तीचे वसुली थांबवण्याचे आदेश ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिले होते.मात्र महावितरण प्रशासनाने ऊर्जा मंत्राच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तिसगाव परिसरातील शेतकऱ्यांच्याकृषी पंपाचे वीजपुरवठा खंडित केला आहे.त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतकऱ्यांची रब्बी पिके संकटात सापडलीआहे.त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कृषी पंपाचा वीज पुरवठा पुरवत करावा अन्यथा महावितरण कार्यालयासमोर गुरेढोरे बांधण्याचा इशारातिसगाव चे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव यांनी दिला.                     

यंदा राज्यातील शेतकरी दुबार संकटात सापडला आहे.एकीकडे अनेक भागात ओला दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झालेआहे.त्यामुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली असून, हातात पडलेल्या शेतमालाला ही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटातसापडला आहे.तर दुसरीकडे महावितरण प्रशासनाने कृषी पंपाच्या बिलाची सक्तीची वसुली धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट निर्माणझाले आहे.अगोदरच खरिपाची पिके हातातून गेले.रब्बी पिकाच्या भरोशावर शेतकरी असताना महावितरण प्रशासनाने  सक्तीची वीज बिलवसुली थांबवावी.यासाठी विविध शेतकरी संघटना व सामाजिक संघटनांनी आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.या आंदोलनाचीदखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार 21 नोव्हेंबर रोजी महावितरण प्रशासनाला सक्तीची वीज बिलवसुली थांबवण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल अशी आशा पल्लवीत झाली असताना, महावितरण नेउपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल खंडीत करण्याचासपाटा सुरू केला आहे.वाळूज औद्योगिक वसाहती मधील तिसगाव गट नंबर 2 ते 26 परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थ्री फेज वीजपुरवठा खंडित केला आहे.तसेच सिंगल फेज वीजपुरवठा सुद्धा खंडित केल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांच्या रब्बीपिकावर वीज पुरवठा खंडित मुळे मोठा परिणाम होणार आहे.तसेच शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळेमहावितरण प्रशासनाने तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा.अशी मागणी तिसगाव परिसरातील शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आलीआहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!