July 26, 2024
Home » सतरा वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग; वडगाव गट न. येथील घटना, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल…

वाळूज : वाळूज परिसरातील वडगाव गटनंबर मध्ये राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिलाची घटना वडगाव कोल्हाटी येथे दिनांक 24 रोजी रात्री 9 वाजता घडली आहे, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अल्पवयीन सातारा वर्षीय मुलगीच्या परिचयाचा व वडगाव येथे राहणार मुलगा मुलीच्या घराजवळ येऊन माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये ये म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला त्याला नकार देताच त्याने मुलीचा हात पकडून वाईट उद्देशाने जवळ ओढून, तू माझी नाही तर कुणाची नाही असे म्हणत वाईट कृत्य केले. मुलीने आरडाओरड केली असता तो तेथून पळून गेला. पुन्हा दिनांक 25 रोजी सकाळी 8 वाजता बजाजनगरमध्ये मुलीच्या पाठीमागे येऊन मी मरेल आणि तुलाही मारेल अशी धमकी देत निघून गेला. याप्रकरणी आरोपी फरार असून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!