July 21, 2024
Home » वडिलांच्या मृत्यूनंतरही जिद्दीने केला अभ्यास; उज्वला झाली एस. टी. आय. अधिकारी…

भराडी(सिल्लोड) : वडिलांच्या मृत्यूनंतर बिकट झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करीत येथील सरस्वती भुवन प्रशालेची उज्वला पंढरीनाथ शेजुळ या विद्यार्थिनीने सहायक विक्रीकर निरीक्षक (एस टी आय )च्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. भराडीपासून जवळच असलेल्या दीडगाव येथील राहणारी उज्वला हिचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सरस्वती भुवन मध्ये झाले.

बारावी उत्तीर्ण होताच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला शिक्षकांनी प्रेरणा दिली. प्रथम सिल्लोड येथे कांही काळ खाजगी शिकवणी लावली, अभ्यास केला .पुढे यात अधिक गती यावी म्हणून तिने औरंगाबाद गाठले.एकीकडे बीएस्सीची ,तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. उज्वलाचे वडील शेतकरी होते.घरी पाच एकर कोरडवाहू शेती. घरची स्थिती सर्वसाधारणच. स्पर्धा परीक्षेची ।तयारी सुरू असताना तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. दवाखाण्याला भरपूर पैसा लागू लागला. शिक्षणाचा खर्चही वाढताच होता.काही दिवसातच वडिलांचे निधन झाल्यामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली.काहींनी मदतीचा हात पुढे केला.पण बऱ्याच जणांनी पाठ वळवली.हे दाहक अनुभव पचवणे कठीणच होते अशा स्थितीत पुढे शिक्षणाचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला हा काळ उज्वलाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता मात्र आईने मोठा धीर दिला.तिची मानसिकता सांभाळली, तिला बळ देत उज्वलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. ग्रामीण भागात नाहीतरी मुलींचा विवाह लवकरच केला जातो त्यात उज्वलाला वडील नाहीत म्हणून मुलीचे लवकर लग्न करून टाकावे असा सल्ला अनेकांनी दिला मात्र मुलीची शिकण्याची आवड पाहता मुलीला अधिकारी बनवायचेच हा निर्धारआईने केला.पैशासाठी कोणासमोर भीक न मागता स्वाभिमानाने शेतात काबाडकष्ट करून उज्वलाला शिक्षणासाठी पैसे पुरवले. उज्वलाने।वेळेचे गणित आखत ,नियोजन केले व जिद्दीने अभ्यास करीत हे यश संपादन केले व आईच्या कष्टाचे पांग फेडले. उज्वलाला एक बहीण व एक भाऊ आहे बहिणपण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.तर भाऊ नीटची तयारी करीत आहे. उज्वलाला वाचनाची आवड असून, शालेय पातळीवर ।कबड्डी मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. उज्वलाच्या यशाने ग्रामीण भागातील टॅलेंट पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे प्रशालेत तिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक गणेशसिंग गौर यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपमुख्याध्यापक युवराज पाडळे, पर्यवेक्षक संजय दाभाडे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते सरस्वती भुवनने अभ्यासाची मुळातून करून घेतलेली तयारी, दिलेली प्रेरणा, केलेले संस्कार यामुळे मला यश मिळाल्याचे कृतज्ञतापूर्वक तिने सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा तानाजी मांदळे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!