July 26, 2024
Home » भावासह दोन बहिणींना ट्रकने चिरडले

वाळूज : कंपनीत कामासाठी दोघा बहिणीला सोडण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघेही बहीण-भाऊ ट्रकच्या चाकाखाली सापडून ठार झाल्या.हा भीषण अपघात आज गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वाळूज उद्योग नगरीत घडला.
या विषयी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दीपक कचरू लोखंडे 20, रा.ओम साईनगर, रांजणगाव) हा आज गुरुवारी सकाळी मोठी बहीण अनिता (22)व लहान बहीण निकिता (18)या दोघींना दुचाकी (क्रमांक एम एच 21,ए एम 6995) वर बसवून त्यांना कंपनीत कामावर सोडण्यासाठी चालला होता. रांजणगाव फाटा येथून उद्योग नगरीतील रेणुका ऑटो या कंपनीत जात असताना सकाळी 8 वाजेच्या सुमारास एनआरबी चौकलगत दीपक याच्या दुचाकीला ट्रक (क्रमांक एम एच 04,एफ जे 5288)च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघेही बहीण- भाऊ गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव चे माजी उपसरपंच अशोक शेजुळ, रामचंद्र पाटील, शिवगिर गिरी, रोहिदास मारकवड, सुरेश गायकवाड यांनी तिघांना रुग्णवाहिकेतुन शासकीय रुग्णालयात दाखल केले।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!