July 23, 2024
Home » प्रेमप्रकरणातून तरुणाने पेट्रोलने स्वतःला जाळून घेत प्रियसीच्या अंगावर पेट्रोल टाकले अन ….
Aurangabad : औरंगाबाद शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणाने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःलाही जाळून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.  प्रेमप्रकरणातून हि घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दोघांनाही पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. गजानन मुंडे आणि पूजा साळवे अशी प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी गजानन मुंडे आणि पूजा साळवे यांच्यात प्रेमप्रकरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात जमत नसल्याने दोघांमध्ये वादही झाले होते. त्यामुळे याबाबत पूजा साळवेने पोलिसात दोन-तीन वेळा लेखी तक्रारही दिली होती. परंतु पोलिसांकडून अदखलपात्र नोंद करण्यात आला आणि पूजाच्या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याची खंत या मुलीच्या मैत्रिणींनी व्यक्त केली.
आज दुपारी महाविद्यालयात सुट्टी झाल्यावर पूजा साळवे प्राध्यापक कक्षात एकटीच बसली होती. हीच संधी साधून गजानन अचानक आतमध्ये घुसला आणि त्याने आतून कडी लावून घेतली. पुजाला काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. स्वतःच्या अंगाला आग लागल्याने त्याने पुजाला मिठी मारली. त्यामुळे यात दोघेही भाजले. त्यानत्राची त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा साधारण 70  तर मुलगी 30 टक्के भाजले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!