July 21, 2024
Home » महाराणा प्रताप चौकात मुख्य रस्त्यावर झाड कोसळले

वाळूज प्रतिनिधी : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकाजवळील दरवळीच्या ठिकाणी अचानक वडाच्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली. त्यामुळे एक तास वाहतूक खोळंबली होती. विशेष म्हणजे झाड पडले त्याच्या समोरच एमआयडीसीचे कार्यालय आहे परंतु एक तास उलटूनही त्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही, परिणामी वाहतूक खोळंबली. एक तासानंतर दोन व्यक्तींनी येऊन वडाच्या झाडाची फांदी तोडून रस्त्या मोकळा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!