July 22, 2024
Home » आनंद नगरी चे आयोजन म्हणजे विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योगपती बनवण्याची कार्यशाळा- व्यंकट मैलापुरे

औरंगाबाद,वाळूज : आनंद नगरीमुळे विद्यार्थ्यांना अगदी बारीक सारीक गोष्टीचे नियोजन करणे शिकता येते.जसे स्टॉलचे भाडे, खाऊ बनवण्यासाठी साधन सामग्री जमा करून त्या साधनसामग्रीचे चौकसपणे किंमत ठरवणे. कच्चामालाचे योग्य भाव करणे, तसेच बनवलेल्या पदार्थ विकण्यासाठी योग्य ती मार्केटिंग करणे तसेच जमा खर्चाचे ताळमेळ करणे व नफा ठरवणे या सर्व बाबीमुळे विद्यार्थ्यांचा कल व्यापारी व उद्योजक बनण्याकडे वळतो त्यामुळे आनंद नगरीला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. त्यामुळे यातून एक प्रकारे विद्यार्थ्यांना व्यापारी उद्योगपती बनवण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
असे प्रतिपादन इपका कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख व्यंकट मैलापुरे यांनी केले. रांजणगाव शेणपुंजी येथील शहीद भगतसिंग हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंखे या होत्या.प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक इपका कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख व्यंकट महिलापुरे पंचायत समिती सदस्य दीपक बडे, शिवाजी बोडखे, संस्थेचे संचालक नानासाहेब हारकळ, अक्षय हरकळ आदींची उपस्थिती होती. यावेळी दीपक बडे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून पालकांनी सढळ हाताने या आनंद नगरीत खर्च करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन केले.तर शिवाजीराव बोडखे यांनी या आनंदनगरीतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा वाव मिळतो व त्यातून भविष्याचे व्यापारी निर्माण होतात असे सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय काळे यांनी केले.

https://www.youtube.com/@news-marathwada

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!