July 23, 2024
Home » कायगाव येथे भीषण अपघात ;चार ठार

गंगापूर ( औरंगाबाद ) : गंगापूर येथील कायगाव येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर कायगाव जवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बजाजनगर येथील चौघा व्यावसायिकांचा मृत्यू झाला.

अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी कार (क्रमांक एम.एच.२० सी. एस. ५९८२ ) च्या चालकाला कायगाव जवळ वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार (एम.एच.२७ बी. झेड. ३८८९) ला धडकली यात औरंगाबाद कडे जाणाऱ्या कार मधील चौघे गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोनि अशोक चौरे, उपनिरीक्षक विलास , घुसींगे,डॉ.प्रशांत पंडूरे, रुग्णवाहिका चालल सागर शेजवळ, सचिन सुराशे, अनंता कुमावत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता; डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले मृतांमधील तीघांची नावे समजली असून रावसाहेब मोटे(५६) सुधीर पाटील (४५) रा. वाळूज सिडको महानगर रतन बेडवाल (३८) भाऊसिंग गिरासे 45, रा. सिडको वाळूज महानगर वाळूज यांचा मृत्यू झाला.

मृत चौघेही मित्र असून प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते अशी माहिती मिळाली आहे; चौघेही एका व्यवहारा संदर्भाने नगरला गेले होते येताना प्रवरासंगम येथे जेवण करून बजाज नगर येथे घरी जात असताना अपघात झाला; तर दुसऱ्या कार मधील शशिकला कोराट(७०) सिद्धार्थ जंगले (१४) हेमंत जंगले (५५) छाया जंगले (३५) शंकुतला जंगले (७०) हे पाच जन जखमी झाले असून अपघात स्थळावरून त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले; या कारमधील जखमी प्रवासी अमरावतीहून देवगड जि.अहमनगर येथे देव दर्शनासाठी मुक्कामी जात होते; सदरील अपघातानंतर नगर औरंगाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती; त्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून अपघातस्थळी नेण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!