July 21, 2024
Home » शिंदे सरकारला घरचा आहेर, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी गुन्हेगारी वाढली, या संदर्भात पोलिस आयुक्तांना निवेदन..

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी औरंगाबाद पोलिस आयुक्तांना औरंगाबादमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज दि. १७ रोजी निवेदन दिले आहे.

निवेदनामध्ये लिहले आहे की, औरंगाबाद येथे मागील काही महीण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. दिनांक १३/ ११/२०२२ रोजी दुपारी रिक्षा चालक नामे सय्यद अकबर सय्यद हमीद, रा. पडेगांव याच्या रिक्षामध्ये पिडीत मुलगी बसून प्रवास करत असतांना रिक्षाचालक आरोपीने अश्लील व बेकायदेशीर बोलला यामुळे पिडीत मुलीने घाबरुन जावून रिक्षाचालकाच्या पाकापोटी चालू रिक्षा मचून बचावासाठी उडी मारुन घेतली त्यामुळे ती जखमी झाली आहे. या मध्ये. सदर प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होवून बातमी समाज माध्यमाव्दारे बातमी प्रसारीत झाली त्यामुळे शहरातील महीला मुली, विद्यार्थी ज्येष्ठ नागरीक यांच्या मनामध्ये भितीचे वातारवरण निर्माण झालेले आहे सदर बाब ही शासनाच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर आहे त्यामुळे जनमानसांमध्ये शासनाची प्रतिमा मलीन होत आहे.यापूर्वी देखील शहरात विविध भागामध्ये रिक्षाचालकाने प्रवाश्यांना निमनुष्य भागात नेवून त्यांचे मोबाईल, पैसे हिसकावले त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे व महीला प्रवाशांना देखील अश्लिल बोलून विनयभंग केल्याचे असे शहरात घटना घडलेले आहे. बरेच रिक्षाचालक हे रिक्षा चालवताना १) गणवेश घालत नाही व बॅच बिल्ला लावत नाही २) रिक्षा चालक हे विना परवाना रिक्षा चालवितात ३) अनेक रिक्षाचालक हे मद्यपान, गांजा, तत्सम नशेचे पदार्थाचे सेवेन करून रिक्षा चालवितात ४) रिक्षा चालक हे स्टॅण्ड सोडून चौकामध्ये रोडच्या एक्झीट पॉईंट ला रिक्षा उभ्या करतात त्यामुळे सर्व सामान्य माणसांना आस निर्माण होतो. ५) ब-याचश्या रिक्षामध्ये पोलीसांचे नंबर क्युअर कोर्ड व दामिनीचे पथकाचे नंबर नसतात ६) अनेक रिक्षामध्ये मिटर नसतात. ७) ब-याचश्या रिक्षाच्या बनावटीमध्ये फेरफार करून अतिरिक्त सिट बसविलेले आहे. व ते परवान्यापेक्षा व ३ प्रवासी पेक्षा जास्त प्रवासी रिक्षा चालवितात असे दिसून आले आहे. तरी अश्या घटना घडू नये गुन्हेगारावर पोलीसांचा वचक रहावा, त्याकरीता आपण त्वरीत कार्यवाही करावी.मागील एक ते दिड वर्षापासून छ. संभाजीनगर शहरामध्ये मोठया प्रमाणात युवक हे नशेखारीच्या मागे लागलेले ‘आहे. रात्री अनेक खेळाच्या मैदानामध्ये जसे, आमखास मैदान, मराठवाडा सांस्कृतीक मंडळ,जि.प. मैदान, औरंगपुरा, असे इतर मैदानावर मद्यपान गांजा, तसे बटन चे नशा करतात तसेच ते घरातील आई-वडील वृध्दांना मारहान करतात, यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण शहरात वाढलेले आहे असे अनेक तक्रारी मला प्राप्त झालेल्या आहे छ.संभाजीनगर शहरात पंधरा दिवसापुर्वी शा.वै.म. व रुग्णालय, घाटी येथील गेट जवळ दोन इसमांचे निर्धुन हत्या करण्यात आलेली आहे तसेच त्यापूर्वी देखील शहरामध्ये खून, घरफोडया, जबरी चो-या मोटार वाहनाच्या चो-या यामध्ये मोठयाप्रमाणात वाढ झालेली आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.छञपती संभाजीनगर शहर हे महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असून तसेच येथे अनेक पर्यटक भेट देत असतात. तसेच येथे मोठ्या प्रमाणात एम.आय.डी.सी. विकसीत झाल्याने व विकसीत होत असल्याने पर्यटक च उद्योजक हे शहराची कायदा व सुव्यवस्थेचा अभ्यास करुनच शहरामध्ये येतात शहरामध्ये गुन्हेगारी वाढल्याने त्याचा विपरीत परीणाम पर्यटन व उद्योग क्षेत्रावर होतांना दिसून येत आहे..तरी शहरामधील नागरीकांचे जिवीत व मालमत्तेचे नुकसान होणार नाहीव शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच उपरोक्त सर्व बाबींचा गांभीयाने विचार करून अश्या घटना परत होणार नाही याकरीता त्वरीत कार्यवाही तथा उपाययोजना कराव्यात, त्वरीत कार्यवाही तथा उपाययोजना केली नाही तर बाळासाहेबांची शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यांत येईल. होणा-या सर्वस्वी जबाबदारी आपली राहील

संबंधित रिक्षाचालकवर गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील ऑटोरीक्षा परवाना रद्द करणे बाबतचा प्रस्ताव प्रदेशिक परिवहन विभाग यांना पाठविण्यात – औरंगाबाद पोलिस आयुक्त

दि. १३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये दि. १५ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल होताच. प्राधान्यक्रमाने या गुन्ह्याचा तपास हाती घेऊन संबंघित रिक्षाचालक अकबर हमीद सैय्यद याला अवघ्या काही तासातच ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.२७२/२२ नुसार भादंवि कलम ३५४ (ए), पोस्को सेक्शन १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हद्दीमध्ये दामिनी पथक व पोलीस गस्त वाढविली आहे.नमूद गुन्ह्यातील ऑटोरीक्षा परवाना रद्द करणे बाबतचा प्रस्ताव प्रदेशिक परिवहन विभाग यांना पाठविण्यात आलेला आहे.महिला व बालिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद शहर येथे पोलिस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे रिक्षा तपासणी मोहीम सुरु केली आहे असे औरंगाबादचे पोलिस आयुक्त म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!