July 21, 2024
Home » ट्रक चालकास लुटणाऱ्या टोळक्याला करमाड पोलिसांनी केले एका तासात जेरबंद

Aurangabad : मालवाहतूक करणाऱ्या ट्रकास अडून ट्रक ड्रायव्हरला मारहाण करीत खिशातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या थोडक्याला करमाड पोलिसांनी एका तासात अटक केले आहे .


करमाड पोलीसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार श्रीरामपूर येथून एम.एच.१७ बी. टी.८६४९ या मालवाहू ट्रकामध्ये श्रीरामपूर येथून जालनाकडे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आंबेडकर चौक येथे कार आडवी लावून थांबवित ट्रक ड्रायव्हर भैय्या शेख सय्यद (वय – ३६ रा .श्रीरामपूर )याला मारहाण करीत खिशातील मोबाईल व रोख रक्कम पाचशे रुपये हिसकावून घेत पळ काढला . घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती मिळताच करमाड पोलिसांची टीम ॲक्शन मोडर मध्ये आली व आरोपींचा पाठलाग करीत एका तासात पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले .सर्व आरोपी (१) करण सुरेंद्र सिंग वय -२१ ,(२)आशिष संतोष निर्मल वय -२२ (३)जय कन्हैया भंडारकर वय -२१,(४)कासिम कादर शेख वय -२४,(५)उमेर रहीमोदिन शेख वय -२०,राहणार जालना येथील आहे .
पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण मनिष कलवानिया उप विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले,सह पोलीस निरीक्षक राठोड, पीएसआय बनकर,सुनील गोरे, कारवाई करण्यात आली आहे .पुढील तपास पो.हे चव्हाण,पो.ना.मधेवाड,पो.डोके,पो.बनकर, पो.ढाकणे,अतुल गिते हे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!