July 26, 2024
Home » सुषमा अंधारे यांची तोफ औरंगाबादेत धडाडणार; मंत्र्यांना घेरणार!

औरंगाबाद : मंत्री संदीपान भुमरे यांचा गड मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीत येत्या १८ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीरसभा होणार आहे. अंधारे पहिल्यांदाच पैठणमध्ये सभा घेत असल्याने या सभेकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. औरंगाबाद हा तसा शिवसेनेचा गडमानला जातो. एकनाथ शिंदे यांच्या बंडात येथील सहा आमदारांनी शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. ठाकरेंसाठी हा सर्वांत मोठा धक्का होता. औरंगादेतील पडझड रोखण्यासाठी आणि बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी ठाकरे गटाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्याच प्रयत्नाचा भागम्हणून अंधारे भुमरेंच्या बालेकिल्ल्यात सभा घेतायत.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर औरंगाबादेतील बंडखोरांच्या मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेत डॅमेज कंट्रोल करण्याचाप्रयत्न केला होता. औरंगाबादेतील आदित्य ठाकरे यांच्या सभा चांगल्याच जागल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी सिल्लोड येथे जाहीर सभा घेत बंडखोरावर कडाडून प्रहार केला होता. त्यानंतर त्यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात जाऊन दुसऱ्यांदाभुमरेंचा समाचार घेतला होता.

येत्या १८ नोव्हेंबर रोजी भुमरेंच राजकीय गड समजल्या जाणाऱ्या पैठण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सभा होणार आहे. या सभेसाठीशिवसेना नेत्या सुषमा अंधारे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेतेउपस्थित राहणार आहे, अशी माहिती पैठण तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी दिली आहे. औरंगाबदेतील दोन मंत्र्यांसह पाच सेनेत्यांनी बंडखोरीकेल्यानंतर शिवसेना उपनेत्या अंधारे ह्या पहिल्यांदाच औरंगाबाद येऊन जाहीर सभा सभा घेऊन बंडखोरारांवर आसूड ओढणार आहेत. आतापर्यंतमहाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिंदे-गट आणि भाजपचा समाचार घेत असलेल्या अंधारे औरंगाबादेत जाऊन शिरसाठ-भुमरे-सत्तार यांच्यावरकाय बोलणार? याकडे शिवसैनिकांचं लक्ष असेल. तसेच संजय शिरसाठ शिंदे गटात नाराज आहेत, ते वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत सुषमा अंधारे यांनी मागील आठवड्यात दिले होते. आता त्या औरंगाबादेतच जात असल्याने त्यांच्यात बोलणं होणार का? त्यांची भेट होणारका? हे ही पाहणं महत्त्वाचं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!