July 26, 2024
Home » मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर

Thane : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३५४ कलमांतर्गत आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. तसे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!