July 23, 2024
Home » सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांचा शुभारंभ…

संभाजीनगर : पश्चिम मतदार संघातील उस्मानपुरा -क्रांतीनगर येथे श्री बनसोडे यांच्या घरापासुन ते श्री किरण यादव यांच्या घरापर्यंत तसेच शेख जॉकी यांच्या घरापासुन ते अजंता हॉस्टेल पर्यंत स्थानिक विकास निधितुन होत असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांचा शुभारंभ आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आला.

आमदार शिरसाट म्हणाले की, या भागात अनेक गेल्या अनेक वर्षांपासून समस्या होत्या या भागातील नागरिकान अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, परंतु आता तुमची चिंता मिटली आहे, मी आश्वासन देतो पण ते पूर्ण करण्याची ताकत देखील ठेवतो, या भागातील  संत एकनाथ रंग मंदिर येथील सिमेंट रस्ता, पिरबाजार मधील सिमेंट रस्ते होतील असे अनेक विकास कामे माझ्या माध्यमातून झाली आहे, प्रत्येकाला वाटते  चांगल्या रस्त्यावर आपण गेलो पाहिजे, चांगल्या सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्या पाहिजे या भागातील सर्व लोक माझे आहेत, राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने रहायला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होतो असे प्रतिपादन केले.

यावेळी जिल्हाप्रमुख  राजेंद्र जंजाळ,  भरत राजपूत,  नगरसेवक सिंध्दात शिरसाट, उपशहरप्रमुख राजू राजपूत, नरेंद्र जबिंदा, राजेंद्र जबिंदा, गणेश जाधव, सागर वाडकर,  शिल्पाराणी वाडकर, संतोष जाधव, किरण यादव, सुशील शर्मा, महेश सूर्यवंशी, अशोक सुर्यवंशी, अरुण मामा तुपे, राकेश भालेराव, गोल्डी महाराज, अजित सिंग, पप्पू कोशल, जगदीश लव्हाळे, दीपक वाघमारे, मोईन कुरेशी, अशपक कुरेशी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!