July 26, 2024
Home » दत्तक गाव योजनेतील शेतकरी व्यापार्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेने काम करावे


संभाजीनगर : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकर्‍यांना मिळावा म्हणून बँक ऑफ इंडियाकडून दत्तक गावात मेळावा घेतल्या जात आहे. या मेळाव्याचा शेतकरी, कष्टकरी छोट्या व्यापार्‍यांनी लाभ घ्यावा तसेच बॅकेच्या अधिकार्‍यांनी देखील दत्तक गाव योजनेतील शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रोत्साहन देऊन त्वरीत कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आवाहन विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक तथा पत्रकार देविदास त्रिंबके यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

video


केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी संदर्भात माहिती देण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या वतीने निमगाव-गोंदगाव येथे आयोजित दत्तक गाव मेळाव्याचे उद्घाटन देविदास त्रिंबके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे सहायक व्यवस्थापक अक्षय कुलकर्णी, बँक मित्र नानासाहेब जाधव, प्रदिप काळे, मुकेश शेळके, माजी सरपंच गोरक कवडे, योगेश साळुंके, लाहणू त्रिभुवन, आण्णासाहेब त्रिभुवन, साहेबराव गायकवाड, संजय इनामे, विनोद पाटील, मच्छिंद्र बिडवे, माजी चेअरमन शंकर डघडे, विष्णू गायकवाड, बापूसाहेब सामृत, लक्ष्मण गायकवाड, अजिनाथ मदने, बाबुराव ठोसरवाल, अनिल त्रिभुवन, शिवाजी गायकवाड, प्रभाकर मदने, उत्तम सामृत, वसंत त्रिभुवन, महिला बचत गटाच्या पदाधिकार्‍यांची उपस्थित होती.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व्यापार्‍यांनी बँकशी नाते घट्ट करणे गरजेचे आहे. बँकेने दिलेले कर्ज वेळेत फेडल्यास बँक व ग्राहकांनाही त्याचा मोठा फायदा होतो त्यामुळे बँकेचा व्यवहार थकीत ठेवू नका असा सल्ला बॅक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापन अक्षय कुलकर्णी यांनी दिला.
केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी देशातून ७ जिल्ह्यांची निवड वित्तीय समावेश योजनेत केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगरसह २ जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गावपातळीवर मिळावा यासाठी बॅक ऑफ इंडिया शिऊर बंगला शाखेचे मुख्य व्यवस्थापक संतोष वैद्य, सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अख्यारितमध्ये येणार्‍या दत्तक गावांमध्ये मेळावा घेण्यात येत आहे. निमगाव- गोंदगाव येथे मेळावा घेऊन ग्रामस्थांना बँकेच्या व्यवहाराची संपुर्ण माहिती देण्यात आली.या मेळाव्याचे सुत्र संचालन नानासाहेब जाधव यांनी केले. या मेळव्यात १०० खाते उघडण्यात आले. अपघात सुरक्षा विमा योजनेंतर्गत जवळपास ७० ग्रामस्थाचे खाते उघडण्यात आले. या मेळाव्याचे सुत्र संचालन नानासाहेब जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!