July 25, 2024
Home » परिश्रम, चिकाटी व सातत्य हीच यशाची त्रिसूत्री- जय उपा

औरंगाबाद ( वाळूज ) : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अपयशाला घाबरता कामा नये, जो माणूस प्रयत्नशील असतो त्याच माणसाकडून चुका घडतात,अपयश येते.मात्र या अपयशाला न घाबरतात घडलेल्या चुका मध्ये सुधारणा करून परिश्रम, चिकाटी व सातत्याने ध्येयप्रती वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते.असा सल्ला उर्मी संस्थेचे संस्थापक प्रेरणादायी वक्ते जय उपासे यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव पोळ येथे शनिवार 12 रोजी विद्यार्थ्यांसाठी इपका लेबोरेटरीज कंपनीच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इपका कंपनीचे मानव संसाधने भागाचे प्रमुख व्यंकट महिलापुरे हे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून उर्मी संस्थेचे संचालक जय उपासे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी बोडखे के पी चव्हाण यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना प्रेरणादायी वक्ते जय उपासे यांनी विविध थोर व्यक्तींचे उदाहरणे देऊन करिअर घडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.तसेच गरिबीला शाप न मानता ते वरदान समजून कठोर परिश्रम करून जीवनात यशस्वी असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यावेळी अध्यक्ष भाषणात व्यंकट महिलापुरे यांनी विद्यार्थ्यांचे संवाद साधला.तसेच बारावीनंतर विविध क्षेत्रातील संधी आणि त्यासाठी करावे लागणारे परिश्रम या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.तसेच गरजू विद्यार्थ्यांना बारावीनंतर कुठलीही मदतीची गरज असल्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना व्यंकट महिलापुरे यांनी दिले.कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांनी केले.सूत्रसंचालन के.बी.मोरे यांनी तर आभार प्रतिभा नितनवरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक विलास जाधव, शिवाजी महाजन, अनिल कुमावत, रामेश्वर शेळके, डी.पी.चिमणकर, ए.एन.शेख, सी.एच.गायकवाड, आर. एच. शिरसाट,तुकाराम शेलार, आर. बी.सांगळे, आनंद बोडखे यांच्या सह कर्मचारी एस.बी.बनकर बी.जे.पांडव, ए.एस.बिरुटे आदींनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!