July 26, 2024
Home » जितेंद्र अव्हाड यांना जामीन मंजूर …

Mumbai: हर हर महादेव चित्रपटाला विरोध केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती.  या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर आता विविध संघटनांकडून आक्षेप घेतला जात होता.

 याच घटनाक्रमादरम्यान ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. नंतर  या प्रकरणावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उमटल्या. शिवाय संभाजीराजे छत्रपती यांनीही या चित्रपटाला एक पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शवला होता. याच प्रकरणात पोलिसांकडून जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. आपल्याला अटक झाल्याची माहिती आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली होती. जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!