July 21, 2024
Home » जितेंद्र आव्हाड यांना अटक; चित्रपट गृहात मारहाण प्रकरण ..

छत्रपती संभाजी महाराज यांनी हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार आनंद पराजमे आणि 12 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटकरत जोरदार फाशी दिली तरी चालेल पण गुन्हा कबूल करणार नाही असे विधान केले आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. असे ते यावेळी म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!