July 26, 2024
Home » बजाजनगरात आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत जन आक्रोश मेळावा

Waluj : युवासेना प्रमुख तथा माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ८) बजाजनगर येथे जन आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून बजाजनगरसह वाळुज परिसरात ठीक ठिकाणी आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत.


या मेळाव्यात आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातुन गुजरातमध्ये गेलेले उद्योग, बेरोजगारी व ओला दुष्काळ यावरून शिंदे सरकारवर काय हल्लाबोल करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे हे बजाजनगर परिसरातील तरूणांशीही संवाद साधणार आहेत.
या मेळाव्याला परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख सागर शिंदे , कैलास भोकरे, माजी पं. स. सदस्य गणेश नवले, सचिन गरड, दत्तात्रय वर्पे पाटील, ,महेंद्र खोतकर आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!