July 23, 2024
Home » “अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही” नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल आणि अजीत पवार मुख्यमंत्री होतील, अशी विधानं करत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजपाच्या नेत्यांशी जवळीक वाढत असल्याचीही चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याच्या तक्रारीबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!