July 26, 2024
Home » राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह महावितरण कार्यालय बिडकिन येथे संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको

बिडकीन : आज दि.05 रोजी पैठण ते औरंगाबाद रोडवरील महावितरण कार्यालय बिडकिन समोर संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.सदरिल रास्तारोको आंदोलन हे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सविस्तर माहिती अशी की,बोकुडजळगाव व चिंचोली येथील शेतीसाठी असलेली रोहित्र (डिपी ट्रान्सफॉर्मर) मागील ०८ दिवसांपासून जळालेले असल्याने वारंवार महावितरण विभागास निवेदन देण्यात आले, तसेच औरंगाबाद येथे हि अर्ज प्रस्ताव सादर करुन हि याबाबत महावितरण विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची माहिती व कामकाज न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज महावितरण कार्यालय बिडकिन समोरील पैठण ते औरंगाबाद रोडवर रास्तारोको आंदोलन करुन महावितरण विभागाविरुद्ध घोषणा बाजी करण्यात आली.

रास्तारोको मध्ये दोन्ही बाजुंनी वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या विजपुरवठा सुरळीत करुन द्यावा अशी मागणी हि यावेळी महावितरण कार्यालयास करण्यात आली.रास्तारोको मध्ये शेतकऱ्यांनी जळालेला कापुस व केळी हि यावेळी माध्यमांना दाखवत हातातोंडाशी आलेला घास या महावितरण विभागाच्या वतीने हिसकावून घेत असल्याचा आरोप हि यावेळी शेतकऱ्यांनी केला.रास्तारोको मध्ये जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांच्या समवेत बोकुड जळगाव सरपंच रामेश्वर लोखंडे, चिंचोली सरपंच गणेश राठोड,बोकुड जळगाव उपसरपंच मधुकर मरकड,एल पी चव्हाण, नितीन चव्हाण, चिंचोली चे दिनकर कळसकर, दिनकर कोळगे, रामेश्वर कळसकर, कल्याण कळसकर,अख्तर शेख,महेमुद शहा,सागर फरताळे,गोकुळ कांबळे,लहु अण्णा कातबणे,राजु कोंथिबीरे, मनोज मुरदाडे, लतिफ कुरेशी,रियाजोद्दीन इनामदार, अविनाश राठोड, माणिक राठोड, सुजित जाधव आदींसह. बोकुडजळगाव व चिंचोली येथील  शेतकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!