July 21, 2024
Home » बीड जिल्हयातील ढाब्यावर कारवाई…! मिशनढाबा…!

05 ढाब्यावर कार्यवाही,05 ढाबा मालका सह23 मद्यपीयांना अटक.

बीड जिल्हयात अवैध मद्यविक्रीच्या व इतर मद्याविक्री तसेच धाब्यावर होणाऱ्या अवैध मद्यविक्री होत असल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने व दि.04.11.2022 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त कोरडा दिवस असल्याने धाब्यावर परराज्यातील मद्य व इतर मद्य विक्री सुरु होत असल्यामुळे श्री.प्रदीप पवार,विभागीय उपआयुक्त,औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी बीड जिल्हयाच्या लगतच्या पाच जिल्हयातील अधीक्षक,त्यांच्या पथकासह/भरारी पथक व विभागीय भरारी पथक,राज्य उत्पादन शुल्क,औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांच्या पथकासह बीड जिल्हयातील मुख्य रस्त्यावरील धाब्यावर कारवाई करण्यात आली.त्यामध्ये श्री.पराग नवकलकर,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,जालना,निरीक्षक,अंबड, निरीक्षक भरारी पथक,जालना व विभागीय भरारी पथक,औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांच्या स्टापसह  बीड जिल्हयातील धुळे सोलापुर रोड वरील गेवराई येथील हॉटेल जय भवानी  या धाब्यावर अवैध रित्या मद्यपान करणाऱ्या  व अवैधपणे ढाब्यावर दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन धाबामालक श्री.राजेद्र दामोधर शेंडगे व मद्यपीं 1) श्री.बाळु ज्ञानेश्वर माळी,2) श्री.अविनाश सुधाकर बेदरे,3) श्री.त्रिबंक भाऊराव मदने,4) श्री.गोकुळ बाबुराव चोरमले,व 5) श्री.गणेश थोरात यांना अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्याबाबतची कारवाई सुरु आहे.

श्री.रविकिरण कोले, अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,परभणी,निरीक्षक,परभणी व भरारी पथक परभणी /हिंगोली यांच्या पथकासमवेत बीड जिल्हयातील माजलगाव येथील हॉटेल न्यु तुळजाभवानी  गंगामसला या धाब्यावर अवैध रित्या मद्यपान करणाऱ्या  व अवैधपणे ढाब्यावर दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन धाबामालक श्री.शरद माने व मद्यपीं 1) श्री.मंचक घाटोळ,2) श्री.परमेश्वर शिंदे,3) श्री.संतोष शिंदे,4) श्री.हरिभाऊ शिंदे,5) कुणाल पंडीत व 6) प्रशांत पंडीत तसेच बीड जिल्हयातील माजलगाव येथील हॉटेल धर्मवीर फॅमिली रेस्टारंट या धाब्यावर अवैध रित्या मद्यपान करणाऱ्या  व अवैधपणे ढाब्यावर दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन धाबामालक श्री.भगवान कच्छवे  व मद्यपीं 1) श्री.नभाजी शिंदे,2) श्री.अमोल गावडे,3) श्री.सौरव खाडे,4) श्री.अमर घनगाव व 5) श्री.राजेभाऊ भुतकर यांना अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्याबाबतची कारवाई सुरु आहे.

श्री.गणेश बारगजे,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,उस्मानाबाद,निरीक्षक, उस्मानाबाद व भरारी पथक उस्मानाबाद /लातुर यांच्या पथकासमवेत बीड जिल्हयातील केज-कळंब रोडवरील मौजे वडगाव,ता.केज येथील हॉटेल येडेश्वरी या धाब्यावर अवैध रित्या मद्यपान करणाऱ्या  व अवैधपणे ढाब्यावर दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन धाबामालक श्री.परमेश्वर गुंठाळ व मद्यपीं 1) श्री.राजकुमार गुंठाळ, व 2) श्री.विकास पोपळकर यांना अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्याबाबतची कारवाई सुरु आहे.श्री.केशव राऊत,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,लातुर,निरीक्षक,व भरारी पथक उस्मानाबाद /लातुर यांच्या पथकासमवेत बीड जिल्हयातील परळी रोडवरील हॉटेल स्वाद या धाब्यावर अवैध रित्या मद्यपान करणाऱ्या  व अवैधपणे ढाब्यावर दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन धाबामालक श्री.सतीश गजेवार व मद्यपीं 1) श्री.इम्रान शेख, व 2) श्री.अशोक गरड,3) अमोल बायवे,4) अमोल बोचडे व 5) शुभम जोगदंड यांना अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्याबाबतची कारवाई सुरु आहे.सदर धडक कार्यवाही मध्ये सर्व सामग्री (खुर्ची,टेबल ईत्यादी) जप्त करुन हॉटेल,ढाबा मालक व मद्यपी यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करुन त्वरीत मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.या धडक मोहिमेमध्ये बीड जिल्हयामध्ये एकुण 05 धाब्यावर व ढाबामालकावर कार्यवाही करुन 23 मद्यपी विरुध्द यांना अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्याबाबतची कारवाई सुरु आहे.

 या कारवाई मध्ये श्री.पराग नवकलकर,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,जालना, श्री.राहुल रोकडे,निरीक्षक,अंबड,श्री.निरीक्षक भरारी पथक,जालना व विभागीय भरारी पथक,औरंगाबाद विभाग औरंगाबाद या पथकात श्री.बाळासाहेब राख,दुय्यम निरीक्षक,श्री.विजय वरठा,दुय्यम निरीक्षक,  श्री.गणेश बारगजे,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद,श्री.आर.एस.कोतवाल निरीक्षक उस्मानाबाद,तानाजी कदम,निरीक्षक भरारी पथक उस्मानाबाद/लातुर,श्री.भीमराव ओव्हाळ,दुय्यम निरीक्षक,पी.जी.कदम,दुय्यम निरीक्षक,श्री.घोरपडे,श्री.रविकिरण कोले,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,परभणी,श्री.एस.ए.चव्हाण निरीक्षक परभणी,श्री.जी.एल.पुसे निरीक्षक भरारी पथक परभणी/हिंगोली व श्री.केशव राऊत,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,लातुर श्री.आर.एस.बांगर ,निरीक्षक लातुर,श्री.ए.के.शिंदे दुय्यम निरीक्षक लातुर,श्री.ए.बी.जाधव दुय्यम निरीक्षक उदगीर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!