July 26, 2024
Home » ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबले; 80 फूट विहिरीत कार कोसळली; तिघांचा मृत्यू …

देऊळगाव राजा (बुलढाणा) – कार चालविणे शिकत असताना ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबले त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला तुडुंब भरलेल्या विहिरीत कार कोसळली. यामध्ये कार शिकत असलेली, मुलीचा व वाचण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला, तर पतीने कारमधून उडी घेतल्याने ते सुदैवाने बचावले ही घटना ३ नोव्हेंबरला दुपारी देऊळगाव राजा येथे घडली स्वाती अमोल मुरकुट (वय ४०), तर सिद्धी अमोल मुरकुट (१०), पवन पिंपळे असे मृतकांची नावे आहेत.

सध्या दिवाळीची सुट्टी असल्यामुळे डोरव्ही तालुका सिंदखेड राजा येथील अमोल दिनकर मुरकुट जाफराबाद पंचायत समिती अंतर्गत शिक्षक पदावर कार्यरत आहेत सुट्टया सुरू असल्याने ते पत्नीला कार चालविणे शिकवीत होते कच्या रस्त्याने ते कार चालविणे शिकवीत असताना देऊळगावराजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत असताना ब्रेक लावण्याऐवजी त्यांच्या पत्नी स्वाती मुरकुट यांच्याकडून अॅक्सिलेटर दाबला गेला. कारवरील नियंत्रण सुटून कार तुडुंब भरलेल्या ८० फूट खोल विहिरीत कोसळली. यामध्ये स्वामी मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा बुडाल्याने मृत्यू झाला, तर अमोल मुरकुट हे कसेबसे कारच्या दरवाजातून बाहेर पडले, हि घटना बघून वाचवण्यासाठी गेलेल्या पवन पिंपळे या तरुणाचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांचा मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली तसेच नगरपरिषद व औरंगाबाद अग्निशमन दलाचे बंबांनाही पाचारण करण्यात आले.यावेळी  मुख्य अग्निशमन अधिकारी आर के सुरे यांच्या आदेशानुसार उप अग्निशमन आधिकारी एम. एल. मुंगसे ड्युटी ऑफिसर एच .वाय .घुगे अग्निशामक,सुजित कल्याणकर, शशिकांत गीते,प्रसाद शिंदे, अशोक पोटे,तुषार  तौर, वाहन चालक भुरालाल सलामपुरे, किरण पंडुरे यांनी क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!