July 23, 2024
Home » किरकोळ वादातून चाकूने सफासफ वार; साजापूर येथील घटना.

औरंगाबाद : वाळूज परिसरातील साजापूर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत राज मोहम्मद बन्सी शेख (५५) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी दवाखान्यात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजापुरातील राजू मोहम्मद शेख व महम्मद उमर शेख या दोन कुटुंबात जुना वाद आहे. बुधवारी किरकोळ वादावरून दोन्ही कुटुंबीयांत तुंबळ हाणामारी झाली. फारूक शेख याने राज शेख यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. राज शेख यांचा मुलगा अफरोज याने लाकडी दांड्याने फकीर महम्मद शेखच्या डोक्यावर मारले. फकीरचे डोके फुटले. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी राजू शेख यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!