July 22, 2024
Home » नाशिकमध्ये बसला पुन्हा आग

नाशिक : गेल्या दिवसांपासून चालत्या वाहनाला आग लागल्याच्या घटना वारंवार घडत आहे. नुकताच नाशिकमध्ये एका अपघातात प्रवासी बसला भीषण आग लागली होती. त्यात जवळपास 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. एकूणच या घटणेनंतर प्रशासन धडा घेईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे होतांना दिसून यते नाहीये. खाजगी बसचा अपघात असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची परिस्थिती गंभीर आहे. काही वर्षापूर्वी नव्याने दाखल झालेल्या शिवशाही बसचे अपघात आणि आग लागळ्याच्या घटना समोर आहे. नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे शिवशाहीने पेट घेतल्याची बाब समोर आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली असून यामध्ये प्रवाशाच्याच ही बाब लक्षात आली. त्याने लागलीच प्रवाशांना आणि चालकाला सांगितल्याने सगळेच प्रवासी सामनासहित उतरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!