July 26, 2024
Home » पैठण शहरात एकनाथ भागवत मंदीराची उभारणी करणार-पालकमंत्री संदिपान भुमरे

औरंगाबाद

संत आले संत आले,आवघे घर आनंदले,हर्ष दाटला जळी स्थळी,रोम रोम पांडुरंग झाले या उक्तीप्रमाणे संत सस्नेह मिलनाचा कार्यक्रम पैठण येथे पार पडला. मराठवाड्यातील संत,महंत,किर्तनकार,प्रवचनकार यांच्या उपस्थितीत दिपावलीच्या मंगल पर्वात संत स्नेहमिलन कार्यक्रमात रोजगार हमी फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हजेरी लावली.


यावेळी मंत्री भुमरे यांनी बोलताना संत महंत महाराज यांनी संत सस्नेह मिलनात मांडलेल्या सर्व मागण्या पुर्ण करण्यासाठी कटीबध्द राहील तसेच पैठण घाटावर आरती ,व एकनाथी भागवती मंदिराची उभारणी करुन महाराष्ट्रातील वारकर्यासाठी वारकरी बँकेची उभारणी करु अशी ग्वाही देत आलेल्या सर्व संत महंताचे पुजन करुन स्नेह भोजन दिले.


यावेळी केशव महाराज चावरे,आपेगाव संस्थानचे ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापुरकर,रखमाजी महाराज नवले,विठ्ठल महाराज चनघटे शास्री,नारायनानंद स्वामी,विष्णु महाराज जगताप,नामदेव महाराज पोकळे,तसेचमा.सभापती विलासबापु भुमरे, मार्केट कमेटी सभापती राजुनाना भुमरे,नाथ संस्थानचे कार्यकारी विस्वस्त बाजीराव बारे,दुध संघाचे मा.उपाध्यक्ष नंदलाल काळे,शहादेव लोहारे,गणेश मडके, खराद, अमोल जाधव, सह संत महंताची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!