July 26, 2024
Home » गुन्हेगाराने पोलीस आयुक्तालयात ओतून घेतले पेट्रोल

औरंगाबाद:

पोलीस आयुक्तालयात अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा एकाने शनिवारी सायंकाळी प्रयत्न केला. रामचंद्र पिपळे (रा. चिकलठाणा) असे त्याचे नाव असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयुक्तालयाचे गार्ड अनिल गुणवंत पवार यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

आयुक्तालयात रामचंद्र तावातावाने आला. त्याने पेट्रोलची बाटली काढून अंगावर ओतून घेत असताना पोलीस आयुक्तालयाच्या गार्ड व कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. पिपळे म्हणाला, मी गुन्हेगारी सोडली असून तरीही होत असलेल्या पोलीस कारवाईला वैतागलो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!