July 21, 2024
Home » रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) व लोकनेता रामदास आठवले प्रतिष्ठाणच्यावतीने खंदारे कुटुंबियांना मदत


Aurangabad Waluj : वाळूज परिसरात घाणेगाव येथील खंदारे कुटुंब वास्तव्यास आहे. काल दिनांक (29) रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान यांच्या घराला गॅस सिलेंडर गळती होऊन आग लागली होती, त्या आगीत त्यांचा संपूर्ण संसारोपयोगी पैशांसह साहित्य, धान्य, कपडे आदीसह सर्व साहित्य जळून खाक झाले होते. तसेच माध्यमातून अर्चना खंदारे यांनी कुटुंबासाठी मदतीची हाक दिली होती, त्यांच्या या हाकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) व लोकनेता रामदास आठवले प्रतिष्ठाण धावून येत एक महिन्याचे किराणा सामान, मिठाई, साडी आदी भेट देऊन अजूनही भरीव मदत मिळवून देण्यासाठी रिपाइं पक्षाच्यावतीने पुढाकार घेऊन मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस प्रविणअप्पा नितनवरे, तालुका अध्यक्ष किशोर साळवे, वाळूज महानगर अध्यक्ष संजय निकम, सोशल मिडिया प्रमुख सूर्यकांत पठारे, ज्ञानेश्वर जाधव आदी़ं़नी घाणेगाव येथे जाऊन भेट देऊन सांत्वन केले. यावेळी अमोल वाघमारे, राजू कर्डक, संतोष बनसोडे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!