July 26, 2024
Home » सर्व जातीधर्मियांची बजाजनगरात एकत्र छटपूजा…

औरंगाबाद वाळूज : बजाजनगर येथील रामलीला मैदनावर व उत्तर भारतीय यांच्या कडुन दरवर्षी छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा छटपुजा आज रविवार 30 ऑक्टोंबर राेजी हजारो उत्तर भारतीय महिला व पुरुषांनी रामलीला मैदानावर सायंकाळी मावळत्या सूर्यदेवते ची पूजा करून दर्शन घेत छटपूजा मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरा करण्यात आली.

यावेळी हजाराे नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन मैदानाची साफसफाई करुन,हाैदाची सफाई करण्यात आली हाेती. तसेच या ठिकाणी बेदी बनवन्यात आले हाेते. दरवर्षी या ठिकाणी दाेन हजारावर महिला पुरुष येतात. जे उपवास करतात त्यांना हाैदातील पाण्यात पुर्ण स्नान दिले जाते . येणार्याची गैरसाेय हाेऊ नये म्हणुन काळजी घेण्यात आली होती. यासाठी रामलीला मैदान बजाजनगर चे आर के सिंह उद्योजक नरेंद्रसिंह यादव,रोहितसिंह, बच्चासिंग रामाधार , हेमंत श्रीवास्तव, कुंदन त्रिपाठी, रघुनाथ सिंह, राजेश सिंग, आर पी सिंह , राम जयप्रकाश सिग, अरविंद सिंह, राधेश्याम शर्मा, कैलास यादव , सदस्य राजेश सिंह ,संजय सिंह , रामजनम सिह, भूपेन्द्र सिंह परिहार , प्रदीप सिंह ,अक़वाल बहादुर सिंह , अमोघ प्रजापति , राहुल सिंह ,राघवेंदर सिंह , गुडडू सिंह , माया भूमिहार, शुभम सिंह ,सनी सिंह, रोहन सिंह ,सिद्धार्थ सिंह आदिनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!