July 21, 2024
Home » छटपूजा उत्सवाला प्रारंभ

उत्तर भारतीयांतर्फे कार्यक्रम

वाळुज महानगर/ औरंगाबाद

बजाजनगरात उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने छटपूजा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यात येईल.

बजाजनगरातील रामलीला मैदानावर दरवर्षी उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने छटपूजा उत्साहात साजरी करण्यात येते. चार दिवस चालणाऱ्या या छटपूजा उत्सवात उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

दिवाळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून छटपूजा उत्सवाला सुरुवात होते. पहिल्या दिवशी घरात साफसफाई करून पूजेसाठी नैवेद्य तयार केला जातो. दुसऱ्या दिवशी ‘खरना’ मध्ये गुळाच्या

खिरीचा प्रसाद तयार करून भाविक हा प्रसाद ग्रहण करून उपवास ठेवतात. मुलांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी आई-वडील कडक उपवास ठेवतात. तिसऱ्या दिवशी सूर्य मावळताना महिला व पुरुष हौदात उतरून सूर्यदेवतेची पूजा करून अर्घ्य अर्पण करतात.

रविवारी सायंकाळी रामलीला मैदानावर कृत्रिम हौदात हा कार्यक्रम होईल. सोमवारी म्हणजे चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून उत्सवाची सांगता होईल.

या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने आर. के. सिंह, उद्योजक नरेंद्र यादव, आर. पी. सिंह, राम जयप्रकाश सिंह, राधेश्याम शर्मा, कैलास यादव, राजेश सिंह, उदय तोमर, रामजनम सिंह, बच्चासिंह पांडे, रोहन सिंह आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!