July 23, 2024
Home » घाणेगावात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; संपूर्ण घर जळून खाक, महिलेची मदतीसाठी हाक..

औरंगाबाद (वाळूज ) : घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घरात ठेवलेल्या रोख वीस हजारांसह सोन्या – चांदीचे दागिणे तसेच संसारोपयगी साहीत्य या आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दि. २९ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घाणेगाव येथे घडली. सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही.

जाहिरात


घाणेगाव भागातील एकलव्यनगर भागात निरंजन नामदेव खंदारे हे पत्नी व तीन मुलांसह पत्र्याच्या घरात राहतात. दरम्यान निरंजन हे नऊ वर्षीय मुलीसह चिखली या त्यांच्या गावी गेलेले आहेत. तर त्यांची पत्नी अर्चना या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कंपनीत कामाला गेल्या होत्या. दरम्यान सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि घराचे पत्रे उडून हवेने आगिचे लोळ सर्वत्र पसरले. त्यानंतर घरातील लाकडी दीवानने पेट घेतला. काही वेळातच घरातील फ्रीज, टीव्ही, अन्नधान्य दिवाळीसाठी घेतलेले कपडे रोख वीस हजार आणि घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिणे असे सर्व साहित्य या आगीत जळून राख झाल्याचे अर्चना खंदारे यांनी सांगितले. दरम्यान अर्चना यांची अकरा वर्षीय मोठी मुलगी अडीच वर्षीय लहान भावाला घरापासून लांब खेळवत होती. त्यामुळे घरात कोणी नसल्याने सुदैवाने या घटनेत जीवीत हानी टळली. मात्र घरातील सर्वच साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे या परिवाराचे केवळ अंगावरील कपडेच शिल्लक असून जेवणाचेही वांधे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो.हे. बाबलू थोरात, भगतसिंग घुणावत यांनी घाव घेत पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!