July 25, 2024
Home » जादूटोणा केला म्हणून खून छावणी हद्दीतील घटना; खुनातील फरार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : पोलीस ठाणे छावणी हद्दीमध्ये मिटमिटा शिवार येथील रेल्वे पटरीच्या बाजुला एक अनओळखी इसम मृत अवस्थेत मिळुन आला त्यावरुन छावणी पोलीस ठाणे येथे कलम ३०२ भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपीचा पोलिसांकडून सुरु असतांना वाळूज एमआयडीसी पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हयातील संशयीत आरोपी रांजणगाव- कमळापुर येथली असुन तो फर्निचरचे दुकान असुन फर्निचरचे काम करतो, कमळापुर येथील त्याचे दुकानाचा शोध घेतला असता त्याचे दुकान बंद असल्याने त्याचे बाजुच्या दुकानावर विचारपुस करुन त्यास शेजारील दुकावरुन फोन करुन त्यास आमचे मंदीरातील फर्नीचरचे काम करायचे असे खोटे कारण सांगुन त्यास कमळापुर येथे बोलावुन घेतले. पो.नि. श्री इंगाले, पो.नि.श्री पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोउपनि श्री निर्वळ, पोना बाळु लहरे, पोअं/ कोल्हे, पोअं/कुटे यांनी सदर ठिकाणी सापळा लावला व संशयीत आरोपी दिसुन येताच त्याला ताब्यात घेवुण विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव सद्दाम सैय्यद शीराज सैय्यद, वय २४ वर्षे, ह.मु. शिक्षक कॉलनी, रांजणगाव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद, मुळ रा. इदगा मोहल्ला नविन बसस्टॅन्डच्या पाठीमागे, ता.घणसावंगी, जि. जालना असे सांगितले. संशयीत ईसमास छावणी येथील खुणाच्या गुन्हयाबाबत अधिक विचारले असता त्यांची सांगितले की, मयत यास मि ओळखत असुन त्याचे नाव कारभारी सिध्दु शेंबडे, वय ४२ रा. घोन्शी, ता. घणसावंगी, जि. जालना असे सांगितले.

advertisement

मयत हा आरोपीच्या सासर घोन्शीचा असल्याने त्यांची ओळख होती. आरोपी हा कमळापुर येथे फर्निचरचा व्यवसाय करत होता. मयताने जादुटोना केल्यामुळे आरोपीचा व्यवसायात नुकसान झाले तसेच मयत हा इतर जादुटोणा करत असल्याचे व जडीबुटी देत असल्याचे सांगितले. मयताने जादुटोणा केल्यामुळे आरोपीच्या व्यवसायात नुकसान झाले असल्याचे समजुन त्याचा राग मनात धरुन आरोपीने मयतास दिनांक २५/१०/२०२२ रोजी ०८.०० वाजता फोन करुन एका महिलेस मलबाळ होत नाही तीस जडीबुटी देण्याचे कारण सांगून रांजणगाव- कमळापुर येथे बोलावले असता मयत, त्याचा भाचा सुनिल व सुनिलचा मावस भाऊ दिनेश पवार असे कारने कमळापुर फाटा येथे आरोपीस १२.०० वाजेदरम्यान भेटले. त्यानंतर आरोपीने सुनिल व सुनिलचा मावस भावास तुम्ही जा कारभारी (मयत) हा चार-पाच दिवसांनी येईल असे सांगितले. त्यांनतर आरोपी व मयत यांनी दारु पिली व त्यानंतर आरोपीने कमळापुर येथील एका हार्डवेअरच्या दुकानावरुन फावड्याचा दांडा विकत घेवुन ते दोघे मो.सा. ने सुमारे संध्याकाळी ०६.०० ते ०८.०० वाजेच्या सुमारास पो.स्टे. छावणी हद्दीतील मिटमिटा शिवार येथील रेल्वे पटरी जवळ गेले व तेथे आरोपी सद्दाम सैय्यद शीराज सैय्यद याने कारभारी सिध्दु शेंबडे (मयत) यास फावड्याचा दांडाने मारुन खुन केला असल्याची कबुली दिली असुन गुरंन ३९१ / २०२२ कलम ३०२ भादवि प्रमाणे दिनांक २६/१०/२०२२ रोजी दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री के. एम. एम. प्रसन्ना, प्रभारी पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर, मा. पोलीस उप आयुक्त, श्रीमती उज्वला वनकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. निशीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगोले, पो. नि. श्री शामकांत रा. पाटील, पोउपनि / श्री राहुल निर्वळ, श्रेणी पाउपनि/ श्री जायभाय, पोना / १०४३ बाळु लहरे, पोअं/ ५१४ राजाभाऊ कोल्हे, पोअं/ ११२२ प्रदीप कुटे, पोअं/ ३१३५ सुरेश कचे यांनी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!