July 23, 2024
Home » झुंजार छावा संघटनेत अनेक युवकांचा प्रवेश

Aurangabad (बिडकीन ): आज दि‌.२६ रोजी रामकिशन लॉन्स, बीड बायपास, बाळापुर फाटा येथे झुंजार छावा संघटनेची महत्वाची बैठक घेण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व बैठकीस सुरुवात करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष निलेश डव्हळे, प्रदेश सचिव सचिन खरात, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष काळे पा., प्रदेश उपाध्यक्ष अनिल गरड, युवक प्रदेश अध्यक्ष अरुण नवले, मराठवाडा कार्याध्यक्ष दत्तात्रय घारे, जिल्हा संपर्क प्रमुख कल्याण शिंदे, शहर अध्यक्ष (पश्चिम)- सचिन भाबट विद्यार्थी शहर अध्यक्ष- अनिकेत शिंदे, शहर अध्यक्ष (मध्य) गोड अप्पा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी सुनिल कोटकर यांनी समाजातील होणाऱ्या चालू घडामोडी, राज्यामध्ये होत असलेले अस्थित राजकारणाबद्दल, शेतकरी, विद्यार्थी या सर्व महत्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.


या बैठकीमध्ये अनेक युवकांनी झुंजार छावा संघटनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना शाल, पुष्पहार आणि नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील प्रमाणे, कृष्णा पहाड-मराठवाडा युवक अध्यक्ष, ज्ञानेश्वर मोहिते कामगार जिल्हाध्यक्ष, अनिल सुडके जिल्हा कार्याध्यक्ष, हेमंत कर्डीले युवक जिल्हाध्यक्ष, भागवत भोरे मराठवाडा प्रसिध्दी प्रमुख, अरविंद साळुंके- जिल्हा सचिव, राजु ढेरे शहर अध्यक्ष रिक्षा संघटना, बाबासाहेब झगरे-शहर अध्यक्ष पूर्व, शेख मुजाहीद शहर उपाध्यक्ष, संतोष कळसकर शहर कार्याध्यक्ष, विजय सोनवणे- जिल्हा प्रसिध्दी प्रमुख. सर्व नवनियुत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीचे नियोजन जिल्हाध्यक्ष नंदु गरड यांनी केले होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!