July 23, 2024
Home » बिडकिन येथील ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू…परिसरात खळबळ
मयत

औरंगाबाद ( बिडकीन ) : दहेगाल बंगला ते शेंदुरवादा रोडवरील धामोरी फाट्यावर बिडकिन येथील ३० वर्षीय तरुण अंत्यंत जखमी अवस्थेत पडलेला आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.सविस्तर माहिती अशी की, सकाळी अंदाजे ०९च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती हा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या वतीने पोलिस ठाणे वाळुज येथे देण्यात आली असताना पोलिसांनी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शासकिय रुग्णालय औरंगाबाद येथे उपचार करिता हलविण्यात आले होते.

आज सकाळी पहाटे ०५ वाजेदरम्यान उपचार घेत असताना त्याची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती नातेवाईकांच्या वतीने मिळाली आहे.सदरिल व्यक्ती ची ओळख पटली असुन सदरिल व्यक्ती हा बिडकिन येथील असुन अय्युब उर्फ काळू इस्माईल पठाण,वय ३० वर्षे,रा.पठाणवाडा,बिडकिन असे आहे ‌.सदरील प्रकरणात नातेवाईकांच्या वतीने घातपात झाल्याचा संशय मोठ्या प्रमाणावर व्यक्त केला जात आहे.तसेच हा व्यक्ती बिडकिन येथुन कशासाठी या परिसरात आला होता, याचा अपघात झाला कि घातपात झाला याबाबत चा तपास पोलिसांच्या वतीने केला जात आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!