July 21, 2024
Home » दिवाळी खरेदीने बाजारपेठ फुलली

बोनस हाती पडताच कामगार खरेदीला बाहेर

सर्वाना भावणारा दीपोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात उभारले आहेत. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर शहरात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. 

विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!