July 20, 2024
Home » औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; खासदार इम्तियाज जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबाद

सरकारनं तत्काळ औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. याबाबत जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारनं तत्काळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

याबाबत जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई देण्याची मागणीही जलील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!