July 26, 2024
Home » आमदार संजय शिरसाट यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

 बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाट यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. संजय शिरसाट यांना एक आठवडा घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. उपचारांसाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आज शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजी त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना एक आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे.लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताना आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व नेते ज्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे. आता घरी जात आहे, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.

डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मी काही काळ आराम करून लवकरच दोन ते तीन दिवसात कामाला सुरुवात करेन, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!