July 21, 2024
Home » परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान…

सिल्लोड प्रतिनिधी / सुनिल पांढरे : सिल्लोड तालुक्यातील पळशी,अंधारी परिसरात सलग तिन दिवसांपासून परतीचा पाऊस पडत असल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी रात्री पुन्हा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सोंगलेल्या मका, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. असून दिवाळीच्या तोंडावर अस्मानी संकटाने परिसरातील बळीराजा पुरता हताश झाला आहे.

         परिसरात मका, सोयाबीन सोंगनीच्या कामाला वेग आलेला असताना परतीचा पाऊस सुरु झाला. सलग तिन दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने मकाचा चारा, कणस भिजत असून सोयाबीन कुजत आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे कपाशीच्या परिपक्व कैऱ्या कुजत असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी पाच- सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात कपाशीच्या परिपक्व कैऱ्या फुटून कापूस घरात येणार असताना परतीच्या पाऊस सुरु झाला. यामुळे कापूसही भिजला असून शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या पैशांना तुर्त ब्रेक लागला असून पुन्हा दिवाळी साजरी करण्यासाठी उसनवारीची वेळ आहे.

*जाहिरात

    मंगळवारी रात्री पळशी,अंधारी,लोणवाडी,उपळी,मांडगाव, म्हसला,केऱ्हाळा, धानोरा,वांजोळा,आदी परिसरात पुन्हा  जोरदार पाऊस झाला. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. तिन वर्षापूर्वी परिसरात परतीच्या पावसाने असाच हाहाकार केला होता. यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती वरुणराजाने करु नये, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला, तर शेतात पाणी साचले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!